मुंबई – महिलांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदार राम कदम यांच्या राज्यात टीकेची झोड उठली असताना मुंबई पालिका सभागृहानेही कदम यांचा तीव्र निषेध केला. यावेळी बेताल वक्तव्याला माफी नको, गुन्हा नोंदवा अशी जोरदार मागणी करण्यात आली.
घाटकोपर येथील दहिहंडी उत्सवाच्या भव्य कार्यक्रमात भाजपचे आमदार राम कदम यांनी महिलांबाबत अपशब्द वापरल्यानंतर अवघ्या महाराष्ट्रात तीव्र प्रतिसाद उमटत आहेत. टीका झाल्यानंतर कदम यांनी प्रथम दिलगिरी आणि नंतर माफी मागितली. मात्र माफी नको, गुन्हा नोंदवा अशी मागणीही केली जाते आहे. शुक्रवारी पालिका सभागृहातही कदम यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध करण्यात आला. विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी सभागृहात निवेदन करून कारवाईची मागणी केली. आपले नाव राम आहे असे समजतात, मात्र खरे हेच खरे रावण आहेत. बेटी बचाव म्हणणारे बेटी भगाव असे शब्द वापरतात, असे बेताल वक्तव्य करणाऱ्यांना माफी कसली गुन्हा नोंदवायला हवा, अशी मागणी राजा यांनी केली. शिवसेनेचे नगरसेवक दिलीप लांडे यांनी तर राम कदम नव्हे ते रावण कदम असल्याचे सांगत त्यांनी त्यांच्या बेताल वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला. दहिहंडी सारख्या सणाच्या दिवशी एका लोकप्रतिनिधींनी महिलांविषयी असे अपमानास्पद वक्तव्य करणे निषेधार्थ असून विश्वासाला तडा गेला आहे. एकीकडे बेटी बचाव म्हणणाऱ्यांच्या पक्षातच बेटी भगाव म्हटले जाते. एका हाताने राखी बांधून घ्यायची व दुसऱ्या हाताने मुलींना पळवण्याचे वक्तव्य अत्यंत निषेधार्थच आहे. महिलांना हात लावून दाखवा, त्यांचे हात तोडू असा इशारा देत महिलांना हातात राखी बांधून घेणाऱ्याला त्याचे भान नाही. त्यामुळे अशा सडलेल्या कांद्याला वेळीच बाहेर काढायला हवे असे सांगत लांडे यांनी राम कदम यांचा तीव्र शब्दात निषेध केला. हे शिवरायांचे, बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या विचारांचे राज्य असताना महिलांबद्दल असे अशोभनीय, गलिच्छ वकव्य करणे निषेधार्थ असताना त्यांच्यावर गुन्हा नोंद होत नसल्याने राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी संताप व्यक्त केला. आम्ही चार दिवस आंदोलन करून कारवाईची मागणी करतोय, मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते आहे. आमची अपेक्षा होती की मुख्यमंत्री यावर काय तरी स्टेटमेंट करतील, मात्र अद्याप तसे काय झालेले नाही, माफी नको, गुन्हा नोंद व्हायला हवा. कारवाई होईपर्यंत आमचे आंदोलन आम्ही सुरूच ठेवणार असल्याचे राखी जाधव यांनी स्पष्ट केले. तर भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी कदम यांचे वक्तव्य निषेधार्थच आहे. पण त्यांनी माफी मागितली आहे. मात्र ते आमदार आहेत, ते या सभागृहात नाहीत. त्यामुळे त्यांच्याबाबत यासभागृहात निषेधाची चर्चा कशी होऊ शकते. तसे झाले तर यापुढेही अशाप्रकारच्या चर्चा घडवायला हव्यात असे म्हणत त्यांनी यापूर्वीही काही नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य केली होती, तेव्हा का चर्चा का झाल्या नाहीत, तंदूर कांड करणाऱ्यांना आम्हाला शिकवू नये असे कोटक यांनी काँग्रेसला उद्देशून म्हटले.कोटक यांच्या विधानांचे राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी खरपूस समाचार घेतला. तर शिवसेनेनेही कदम यांच्या बेताल वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनीदेखील संबंधित पक्ष त्यांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ का करीत आहे असा, सवाल केला. शिवसेना अशा प्रवृत्तींना कधीही पाठीशी घालत नसल्याचे त्यांनी ठणकावले. तसेच हा सत्तेचा माज असल्याचा आरोपही त्यांनी केला.