मुंबई (निसार अली) : ‘भारत छोडो’ चळवळीचे केंद्र पूर्वीचे गवालिया टॅंक आणि आताचे ऑगस्ट क्रांती मैदान हे होते. 9 ऑगस्ट 1942 च्या लढ्याची आठवण म्हणून येथे शहीद स्तंभ उभारण्यात आला आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि समाजवादी नेते डॉ. जी. जी. पारीख यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी सकाळी गिरगाव चौपाटीवरील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापासून ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत मूक ra काढून ‘भारत छोडो’ लढ्याला अभिवादन करण्यात आले. देशातील वाढती धर्मांधता, जातीयता, शोषण, भ्रष्टाचार या विरोधात ‘करेंगे या मरेंगे’ अशी शपथ घेण्यात आली.