निर्माता चिंटू सिंह आणि दिग्दर्शक पायल लोही यांच्या मराठी चित्रपट ‘रक्त’चा शानदार मुहूर्त नुकताच मुंबईत संपन्न झाला. ‘रक्त’ हा एक भावनाप्रधान अॅक्शनपट आहे. या चित्रपटात आई आणि मुलाची गोष्ट असून एक आई दहा मुलांची काळजी घेऊ शकते, पण दहा मुले मिळून एका आईची काळजी घेऊ शकत नाहीत, अशी या चित्रपटाची संकल्पना आहे. या चित्रपटाचा नायक विश्वास म्हात्रे असून नाना पाटेकर त्याचे आदर्श आहेत. गौरी वानखडे नायिका असून तिची ऑडीशनच्या माध्यमातून निवड झाली आहे.
निर्माते चिंटू सिंह या चित्रपटाबद्दल विशेष उत्साही असून एक भावनिक, प्रेक्षकांना आपलासा वाटेल,त्यांचे मनोरंजन करू शकेल अशी दाक्षिणात्य पद्धतीची अॅक्शन असलेला चित्रपट या निमिताने तयार करण्याचा आपला उद्देश असून रत्नागिरी आणि गोव्यात या चित्रपटाचे चित्रीकरण होणार आहे.
चित्रपटाची निर्माती आणि दिग्दर्शिका पायल लोही यांनीही मराठीत चित्रपट करणे हे आमचे भाग्य असून या चित्रपटाची कथाच स्टार असून नवोदितांचा प्रेमावर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांना नक्की आवडेल असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे.