मुंबई : रविवार दिनांक २६/०८/२०१८ रोजी रक्षाबंधन सण आहे. या सणा निमित्त मुंबई शहर आणि उपनगरात विविध ठिकाणी प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांच्या सोयीकरिता बेस्ट उपक्रमाच्या सर्व बसआगारातून शहर व उपनगरातील विविध बसमार्गावर एकूण १९७ जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत.या बसगाड्यांचे प्रवर्तन सकाळी १०.३० वाजल्यापासून दिवसभर चालू राहील. प्रवाशांची जास्त गर्दी आढळल्यास आवश्यकतेनुसार जादा बसगाड्या सोडण्याचीही व्यवस्था देखील करण्यात येणार आहे. प्रवाशांच्या मदतीसाठी बसथांब्यावर तसेच बसस्थानकावर बसनिरीक्षक, वाहतूक अधिकारी तसेच सुरक्षा अधिकाऱयांची नेमणूक करण्यात येणार आहे.सर्व बसप्रवाशाना आवाहन करण्यात येते की ,त्यांनी या जादा बसगाड्यांची नोंद घेऊन ,उपलब्ध केलेल्या बससेवेचा जास्तीत- जास्त लाभ घ्यावा.