मुंबई, (निसार अली) : लाडक्या भावाला स्वतः बनवलेली राखी बांधण्यातील आनंद एक वेगळाच असतो. तो आनंद लुटता यावा आणि विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन निर्माण व्हावा म्हणून ज्ञानवर्धिनी शाळा चारकोप येथे विद्यार्थ्यांना राखी बनविण्याचे प्रशिक्षण दिले. बुधवार दि. 14 ऑगस्ट रोजी विद्यालयात ‘राखी बनवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली. या मध्ये इ. 5 वी ते 1O वी तील सर्व विद्यार्थी सहभागी झाले.
राखी बनवण्यासाठी आवश्यक साहित्य बाहेरून विकत न आणता घरातीलच विविध वस्तूंपासून तयार केले होते .
राख्या बनवून झाल्यानंतर या राख्यांचे शाळेचे स्कूल कमिटी सदस्य हणमंतराव नलावडे, मुख्याध्यापक हणशी सर व शिक्षकांनी परीक्षण केले. विजेत्या स्पर्धकांची बक्षिसे ‘ मॅजिक बस फाउंडेशन’ यांचे मार्फत पुरस्कृत करण्यात आली.