
रत्नागिरी, (आरकेजी) : वर्षा अखेरीच्या काळात गोव्यातून मोठ्या प्रमाणावर गोवा बनावटीची दारू चोरट्या पद्धतीने महाराष्ट्रात आणली जाते. गेल्या काही महिन्यात रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी लाखो रुपयांची महसुल चुकवून आणलेली गोवा बनावटीची दारू पकडली आहे. त्यामुळे सध्या माहामार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर आहे.
मुंबई गोवा महामार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने 2 ठिकाणी तपासणी नाक्यांच्या माध्यमातून वाहनांची तपासणी केली जात आहे. तसेच चिपळूण-कराड मार्गावरही एक तपासणी नाका असून तिथेही वाहनांची कडक तपासणी केली जात आहे. गावांमध्ये कुठे अवैध दारूधंदे सुरु असतील, तर ग्रामपंचायतींनी राज्य उत्पादन शुल्क विभाग रत्नागिरीला त्वरित कळवावे, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभाग रत्नागिरीच्या अधीक्षक संध्याराणी देशमुख यांनी दिली आहे.