कारवाई व्हायचीच असेल तर याहीपेक्षा कडक कारवाई सत्तार यांच्यावर झाली पाहिजे – तटकरे
रत्नागिरी, प्रतिनिधी : राज्यातलं बहुमतातलं सरकार पाहिल्यांदाच एवढं अस्थिर आणि अस्वस्थ आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनील तटकरे यांनी मध्यावधी निवडणुकांबाबत दिली आहे, ते मंगळवारी रत्नागिरीत बोलत होते.
यावेळी तटकरे म्हणाले, सरकार पाहिल्यांदाच एवढं अस्थिर आणि अस्वस्थ आहे. ज्यावेळी अस्थिरतेकडे वाटचाल होते त्यावेळी कदाचित पुढचं पाऊल मध्यावधी निवडणुका हे असू शकतं. मात्र आजची महाराष्ट्रातली सरकारची स्थिती पहिल्यांदाच एवढी अस्थिरतेची आहे असं तटकरे यावेळी म्हणाले.
तसेच जितेंद्र आव्हाड यांच्याबाबत झालेला प्रकार दुर्दैवी असल्याचं खासदार तटकरे यावेळी म्हणाले. तसेच ही कारवाई आकसापोटी झालेली आहे, सरकारने फेरविचार करावा, पोलीस कारवाई अयोग्य असल्याचं तटकरे यावेळी म्हणाले. तसेच महाराष्ट्राच्या एका मंत्र्याने सुप्रियाताईंबाबत काढलेले उद्गार महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारे आहेत. सत्तार यांच्याबाबत मात्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काहीही बोलले नाहीत. कारवाई व्हायचीच असेल तर याही पेक्षा कडक कारवाई सत्तार यांच्यावर झाली पाहिजे असं तटकरे यावेळी म्हणाले.
मंत्रीपदाबाबत अनेकजण वेटिंग लिस्टवर आहेत,
जोपर्यंत तिकिट कन्फर्म होत नाही, तोपर्यंत प्रवाशाच्या मनात अस्वस्थता असते, तशी अस्वस्थता आज अनेक आमदारांच्या मनात आहे, अशी प्रतिक्रिया मंत्रिमंडळ विस्ताराबाबत खासदार तटकरे यांनी दिली आहे. तसेकंब काहीवेळेला विस्तार करणार, करणार अशा बातम्या देत अशांत असणाऱ्यांना शांत करण्याचा तो एक प्रयत्न असतो, कोपराला गुळ लावल्याशिवाय राजकारणात स्थिरता येत नाही, त्यातला तो प्रकार असू शकतो, असा टोला तटकरे यांनी यावेळी लगावला.