रत्नागिरी दि.09:- राज्यातील उमेदवारांना विविध क्षेत्रात या नव्याने निर्माण होत असलेल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने, 12 ते 17 डिसेंबर, 2021 या कालावधीत भव्य “राज्यस्तरीय महारोजगार”आयोजन, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर सदर रोजगार मेळाच्याची माहिती प्रसिद्ध करण्यात आला आहे.
संपूर्ण राज्यातील विविध नामांकित उद्योग / व्यवसाय या मेळाव्यामधे सहभागी होत आहेत. एलजी इलेक्ट्रॉनिक्स प्रा. लि., हायअॅप्लायन्सेस,महिंद्रा सीआय ई ऑटोमोटीव्ह लि., फियाट इंडिया प्रा. लि., आरएसबी ट्रान्समिशन इं. प्रा. लि., ग्रॅव्हिटी कन्स्ल्टंटस प्रा. लि., इ. सारख्या नामांकित कंपन्यांसह महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्या मधील कंपन्या या मेळाव्यात वेगवेगळ्या प्रकारची रिक्तपदे नोंदवत आहेत व अजूनही काही चांगल्या आस्थापना यामध्ये सहभाग नोंदविणार आहेत.
सर्वसाधारणपणे नववी पास पासून पुढे किंवा दहावी व बारावी, आय.टी.आय., डिप्लोमा तसेच बी.ई व इतर व्यावसायिक शैक्षणिक पात्रतेच्या रिक्तपदांसह सहभागी होवू शकतात. विविध क्षेत्रातील साधारणत: किमान 25 हजार रिक्तपदे उमेदवारांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
सदरचा मेळावा हा केवळ ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणा-या उमेदवारांसाठीच घेण्यात येणार आहे. इच्छुक युवक- युवतींनी www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. होमपेजवरील नोकरी साधक (Job Seekar) लॉगीन मधून आपापल्या युझर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगीन करावे. त्यानंतर पंडीत दीनदयाळ उपाध्याय जॉबफेअर या बटनावर क्लिक करुन त्यातील “STATE LEVELMEGA JOB FAIR२०२१” या रोजगार मेळाव्याची निवड करावी. यानंतर उद्योजकनिहाय त्यांच्याकडील रिक्तपदांची माहिती घ्यावी आणि आवश्यक पात्रताधारण करीत असल्याची खात्रीकरुन पदाची निवड करण्याची दक्षता घेऊन, उपलब्ध असलेल्या रिक्तपदासाठी ऑनलाईन पध्दतीने आपला पसंतीक्रम नोंदवून या रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे. इच्छुक व ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणा-या उमेदवारांना त्यांच्या पसंती क्रमानुसार व उद्योजकांच्या सोईनुसार त्यांच्या मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ एसएमएस, दूरध्वनी, ई-मेल किंवा सोईच्या माध्यमाद्वारे यथावकाश कळविण्यात येईल व शक्य असेल तिथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतींचे आयोजन करण्यात येईल. तरी इच्छुक युवक युवतींनीपर्यंत आपला पसंतीक्रम नोंदवून रोजगाराच्या यासुवर्ण संधीचा निश्चित लाभ घ्यावा, असे आवाहन मा. आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे.














