मुंबई : जांयट इंटरनॅशनल या संस्थेला अनेक वर्षाच्या सेवा कार्याचा वैभवी वारसा आहे. नाना चुडासामा यांनी या संस्थेद्वारे सुरु केलेल्या सेवा कार्याचा वारसा पूर्णनिष्ठेने आजही पुढे जात आहे असे गौरवपर उदगार राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज जांयट इंटरनॅशनलच्या ४३ व्या अंतरराष्ट्रीय अधिवेशनात काढले.
दादर येथे योगी सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला सायना एन.सी. अभिनेत्री सोनाली बेंद्रे, आमदार, मंगल प्रभात लोढा, मनोज तिवारी, प्रिती शहा यासह वेगवेगळा क्षेत्राचे मान्यवर उपस्थित होते. जांयट इंटरनॅशनल या संस्थेने आरोग्य, शिक्षण, भूकंप पुरपरिस्थिीमध्ये मदतकार्य कुटूंबकल्याण अपंगांसाठी कार्य आदि अनेक क्षेत्रात मानवतावादी भुमिकेने कार्य केले आहे. या संस्थेत वेगवेगळा क्षेत्रातील लोक चांगल्या हेतूने काम करत आहे. संस्थेच्या कार्याला संस्थेच्या कार्याला सायना एन.सी. अत्यंत चांगल्या पध्दतीने पुढे नेत आहे असेही राज्यपालांना म्हटले. यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जांयटना राज्यपालांच्या हस्ते गौरव करण्यात आला.