Kolhapur : युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात गेल्या १५ वर्षांपासून ६ जून ला राज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन केले जाते. अखंड हिंदुस्तानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला अनन्य साधारण महत्व आहे. या ऐतिहासिक घटनेला आजही तेवढेच महत्त्व आहे. कारण, अठरा पगड जाती बारा बलुतेदारांची मोट बांधून महाराजांनी स्वराज्याला, सुराज्य बनवण्याची किमया साधली. ही प्रेरणादायी घटना लाखों शिवभक्तांना अखंड प्रेरणा देत असते.
छत्रपती शिवाजी महाराजांचेच तेरावे वंशज युवराज संभाजीराजे छत्रपती महाराजांनी पुन्हा या सोहळ्याला पूनर्वैभव प्राप्त करून दिले. आज हा सोहळा लोकोत्सव झाला असून, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवभक्त दरवर्षी रायगडावर येत असतात. परंतु गेल्या वर्षी आणि याही वर्षी कोरोना मुळे हा सोहळा मोजक्याच शिवभक्तांच्या उपस्थितीत साजरा केला जात आहे.