रत्नागिरी : निवडणुकीत जनतेच्या पैशांचा चुराडा होतो, याची चिंता असल्यानेच सरकरमधून आम्ही बाहेर पडलेलो नाही, सरकारचा पाठींबा काढण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील, अशी माहिती गृहराज्यमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी दिली. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी शनिवारी जाहीर करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
महापालिका निवडणुकीसाठी युती तुटल्यानंतर शिवसेना आता सत्तेतून बाहेर पडणार का? असा प्रश्न सेनानेत्यांना विचारला जात आहे . परंतु, वायकर यांनी जनतेसाठी सत्तेतून बाहेर पडणार नाही, असे म्हणत शिवसेना तूर्तास सत्तेतच राहणार असे, स्पष्ट केले आहे. राज्य सरकारचा पाठिंबा काढल्यास अस्थिरता माजेल. आम्हाला पाठिंब्याची चिंता नाही तर राज्याच्या जनतेची चिंता आहे. म्हणूनच पाठिंबा काढलेला नाही, असेही ते म्हणाले.