
मुंबई, दि. ११ (प्रतिनिधी) – भांडुप पश्चिम येथे राजुल संजय पाटील या पक्षाच्या अधिकृत उमेदवार असून येथील बंडखोर उमेदवार मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करीत असल्यामुळे मनसेने एक पत्रक काढून शिवसेना (उबाठा), महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राष्ट्रवादी कॉग्रेस (शरद पवार) पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची यादी प्रसिध्दीस दिली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आपल्याला पाठिंबा आहे असे भासवून राज ठाकरेंच्या नावाचा गैरवापर करणा-या उमेदवारां विरोधात मनसेने एक पत्रक काढले आहे. त्यात मनसेच्या नावाचा गैरवापर करणा-या उमदेवरांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत काही बंडखोर उमेदवारांकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तसेच राज ठाकरे यांच्या नावाच गैरवापर होत असल्याची माहिती पक्ष प्रमुखांकडे आली होती. काही उमेदवारांकडून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करुन राज ठाकरे यांचा आपल्याला पाठिंबा असल्याचे बंडखोर उमेदवार मतदारांना सांगत आहेत. त्यामुळे मनसेने एक पत्रक काढले असून भांडुप पश्चिम प्रभाग क्रमांक ११४ मध्ये राजुल संजय पाटील या पक्षाच्या अधिकृत उमेदवार असल्याचे पत्रकात म्हटले आहे. त्यांच्या मशाल चिन्हा समोरील बटन दाबून त्यांना निवडुण द्यावे असे आवाहन या पत्रकात करण्यात आले आहे. मनसे नेता बाळा नांदगावकर यांच्या सहिनीशी हे पत्र प्रसिध्दीसाठी देण्यात आले आहे.















