
मुंबई : राजस्थानमधील क्रूर घटनेविरोधात 18 ऑगस्टला डाव्या-पुरोगामी संघटना दादरमध्ये निदर्शने करण्यात येणार आहेत. जालोर जिल्ह्यात मानवतेला काळीमा फासणारी हृदयद्रावक घटना घडली. इयत्ता तिसरीत शिकणारा ८ वर्षाच्या इंद्र मेघवालने पिण्यासाठी ठेवलेल्या पाण्याच्या माठाला शिवल्याने मनुवादी शिक्षक छैल सिंह याने अमानुष मारहाण केली.या मारहाणीत इंद्रला गंभीर दुखापत झाली व उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या घटनेच्या निषेधार्थ जाती अंत संघर्ष समिती,मुंबईच्या वतीने पुरोगामी व समतावादी संघटना सोबत गुरूवार दि.१८ आॕगस्ट २०२२ रोजी,सायंकाळी ४:३० वा. दादर रेल्वे स्थानक पूर्व ,स्वामी नारायण मंदिरा समोर तीव्र निदर्शने करणार आहेत, अशी माहिती जाती अंत संघर्ष समितीचे निमंत्रक शैलेंद्र कांबळे यांनी दिली.
या निदर्शनात सेंटर आॕफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू) ,अखिल भारतीय जनवादी महिला संघटना (AIDWA) , भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ (DYFI) ,स्टुडंट्स फेडरेशन आॕफ इंडिया ( SFI ), या कामगार,महिला,युवा व विद्यार्थी संघटना सहभागी होतील. तसेच मुंबईतील इतर पुरोगामी ,समतावादी संघटनांनी देखील यात सहभागी होण्याचे आवाहन जाती अंत संघर्ष समितीच्या वतीने कांबळे यांनी केले.














