
मुंबई : राजस्थान येथील जालोर येथे तिसरीत शिकणाऱ्या दलित चिमुकल्या विद्यार्थ्याने आपल्या उच्च जातीय शिक्षकाच्या मडक्यातील पाणी प्यायल्याने ,शिक्षकाने विद्यार्थ्याला निर्घृण पणे मारून जातीय मानसिकतेतून त्याचा जीव घेतला.
या घटनेचा निषेध करण्यासाठी मुंबईतील सर्व पुरोगामी विद्यार्थी व युवक संघटनेच्या संयुक्त विद्यार्थी आघाडी तर्फे आज दि २५ आॕगस्ट रोजी दुपारी १२ वा. मुंबई विद्यापीठाच्या मुख्य गेटवर तीव्र निषेध निदर्शने करण्यात आली.
सदरील निषेध सभेत सर्व पुरोगामी , समतावादी , आंबेडकरी , डाव्या, विद्यार्थी व युवक संघटना सहभागी झाल्या.
SFI-AISF-सत्यशोधक विद्यार्थी संघटना, DYFI- लोकशाही युवा संघटना,दिशा या संघटनांचे विद्यार्थी व युवक मोठ्या संख्येने सामिल झाले,दलित पँथर सुवर्ण महोत्सव समिती,जनवादी महीला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीही निषेध व्यक्त केला.
सुगंधी फ्रांसिस,प्रविण मांजलकर यांनी उपस्थितांना संबोधित केले. शेवटी भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे जाहिर वाचन झाले व जातीय उतरंडीची प्रतिकात्मक मडकी फोडण्यात आली.















