मुंबई : देशसेवा, युद्धकथन, सामाजिक सेवा यांचा जागर भांडुप येथील सिद्धीविनायक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात करण्यात आला. संस्थेच्या राजारामशेठ विद्यालय- कनिष्ठ महाविद्यालय आणि सिध्दिविनायक इंग्लिश मिडियम स्कुलचे हे संमेलन होते. ‘काॅमेडीची बुलेट ट्रेन’ फेम अभिनेते अरुण कदम, ब्रिगेडीयर व माजी खासदार सुधीर सावंत, मुंबई महापालिकेचे उपशिक्षणाधिकारी पु. ना. चर्हाटे, सनग्रेस हायस्कुल व ज्युनिअर काॅलेज संचालक भालचंद्र दळवी, महाराष्ट्र राज्य टंकलेखन व टायपिंग शिक्षण संस्थाचालक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रकाश कराळे, संस्थेचे संस्थापक रमेश खानविलकर, मुख्याध्यापिका रश्मी खानविलकर, रिद्धेश खानविलकर यावेळी उपस्थित होते.
ब्रिगेडीयर सावंत यांनी भारतॊय सैन्य प्रवेश आणि तेथे चालणार्या कामकाजाची माहिती दिली. सैन्यामध्ये जावून देश सेवा करता येते. तेव्हा विद्यार्थीनींनी सैनात जाणे आवश्यक आहे, असे आवाहन त्यांनी केले. सावंत यांनी त्यांच्या कारकिर्दीतील अनेक युध्दाचे प्रसंग यावेळी कथन केले. खानविलकर दांम्पत्य बजावत असलेले शैक्षणिक कार्य ही देखील देशसेवाच आहे, असे कौतुक त्यांनी केले.
अरुण कदम यांनी अभिनय सादर करत उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद लाभला. महिला आणि मुलींनी ‘स्वसंरक्षणार्थ’ करण्याची प्रात्याक्षिके त्यांनी रंगमंचावर करुन दाखवली. तसेच रमेश खानविलकर यांच्या शैक्षणिक कामगिरीचे कौतुक केले.
सिद्धीविनायक शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेने भरीव काम केलेले आहे आणि राज्याच्या शैक्षणिक इतिहासात यांची नोंद आहे, असे म्हणत उपशिक्षणाधिकारी चर्हाटे यांनी संस्थेच्या आजवरच्या वाटचालीची माहिती दिली. विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि शारिरीक विकास याकडे पालकांनी लक्ष देणे आवश्यक आहे. कारण शरीरिक विकासाबरोबर बौद्धीक विकास होत असतो, असे ते म्हणाले.
दरम्यान, वर्षभरात पार पडलेल्या विविध स्पर्धांमध्ये विशेष प्राविण्य संपादन करण्यार्या विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. पारंपरिक नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले.