मुंबई, (निसार अली) : समाजवादी विचारांचा वारसा घेऊन आयुष्यभर वाटचाल करणारे मुंबईचे माजी महापौर आणि जनता दल सेक्युलर पक्षाचे ज्येष्ठ नेते राजाराम चिंबुलकर यांचे वृद्धापकाळाने काल शुक्रवारी निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि चार मुली असा परिवार आहे. ते राजाभाऊ या नावाने परिचित होते.
राजाराम चिंबुलकर १९४८ मध्ये पहिल्यांदा मुंबई महापालिकेवर निवडून गेले होते. तब्बल ३७ वर्षे त्यांनी उमरखाडी विभागाचे महापालिकेवर प्रतिनिधित्व केले. १९७८ ते ८० या काळात त्यांनी शहराचे महापौरपद भूषविले होते. विद्यार्थीदशेतच त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनात आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही सक्रिय सहभाग घेतला होता. जनता दल सेक्युलर मुंबई पक्षाकडून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.