रत्नागिरी, प्रतिनिधी : मुंबई – गोवा महामार्गाच्या चौपदीकरणाच्या कामामध्ये तालुक्यातील कोंढेतड येथे रस्त्यालगत बांधण्यात आलेली संरक्षक भिंत यावर्षी पावसाळ्याचा प्रारंभ होण्यापूर्वी सुमारे पाचशे फूट खोल दरीमध्ये कोसळली आहे. त्यामुळे कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाच्या दर्जाबाबत अनेक ठिकाणी प्रश्न उपस्थित होत असतानाच, मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदीरकण करणाऱ्या केसीसी बिल्डकॉन कंपनीकडून राजापूर शहरानजीक कोंढेतड-उन्हाळे हद्दीवर बांधण्यात आलेली सरंक्षण भिंत अवकाळी पावसातच कोसळली आहे. महामार्गाच्या मजबुतीकरणासाठी घालण्यात आलेली ही भिंत सुमारे ५०० फूट दरीत कोसळली असून कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
त्यामुळे परिसरातून धावणाऱ्या वाहनांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे . राजापूर तालुक्यामध्ये सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामाच्या दर्जाबाबत स्थानिकांकडून वारंवार तक्रारी केल्या जात आहेत . मात्र त्याकडे ठेकेदार कंपनी व प्रशासन कानाडोळा करत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. राजापूर शहरानजीकच्या कोंढेतड येथे वाहनांच्या सुरक्षिततेसाठी संरक्षक भिंत बांधण्यात आली होती. मात्र पावसाळ्याचा शुभारंभ होण्यापूर्वीच ही भिंत लगतच्या दरीमध्ये कोसळली. त्यामुळे या कामाच्या दर्जाबाबत प्रशचिन्ह निर्माण झालं आहे. कोसळलेल्या वॉलमुळे त्या परिसरातून धावणाऱ्या वाहनांना धोका निर्माण झाला आहे