रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची दमदार बॅटिंग सुरूच आहे. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. राजापूर तालुक्यातील अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आल्यामुळे, पुराचं पाणी राजापूर बाजारपेठेत शिरलं आहे. त्यामुळे नगर प्रशासनाने 1 वाजता भोंगा वाजवून सतर्कतेचा इशारा दिला.
गेले दोन दिवस जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे राजापूर शहराला पुराचा धोका निर्माण झाला आहे. अजुर्ना आणि कोदवली नद्यांच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे या नद्या दुथडी भरून वाहू लागल्या. त्यामुळे राजापूर नगर परिषदेने दुपारी 1 वाजता भोंगा वाजवून जनतेला सतर्कतेचा इशारा दिला. दरम्यान दुपारी 2 च्या सुमारास नद्यांचे पाणी राजापूर शहरातल्या बाजारपेठेत घुसू लागलं. सध्या राजापूर बाजारपेठेतल्या जवाहर चौकात पाणी शिरलं आहे.. त्यात बाजारपेठेतही पाणी शिरण्यास सुरूवात झाली होती. त्यामुळे अनेकांनी आपली दुकानं बंद केली होती.. दरम्यान प्रशासनाकडून लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.