
रत्नागिरी: चिपळूणातील तिवरे धरण गळतीमुळे फुटण्याची घटना घडल्यानंतर धरणांंच्या दुरावस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान रत्नागिरीतील आणखी एका धरणाला गळती लागली आहे. गेला आठवडाभर सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे राजापुर तालुक्यातील कोंडवशी काकेवाडी धरणाला भेगा पडल्या आहेत. धरणाच्या पिचिंगमधून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग होत आहे.
धरणाच्या पिचिंगमधून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर येत आहे. या धरणाच्या खाली गावं आहेत. तिवरे धरणापेक्षा दुपट्टीने हे धरण मोठं आहे. या गळतीमुळे केळवली-कोंडवशी परिसरातील घरांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे प्रशासनानं या धरणाच्या सुरक्षेसंदर्भात वेळीच पावलं उचलणं आवश्यक आहे. दरम्यान आमदार राजन साळवी यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची पहाणी केली व ग्रामस्थांना धीर दिला.















