रत्नागिरी (आरकेजी): लोकशाही धोक्यात असल्याचं मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. सर्वोच्च न्यायालयात होत असलेल्या कारभारामुळे व्यथित झालेल्या चार न्यायमूर्तींनी आज पत्रकार परिषदेत घेऊन आपली व्यथा मांडली. याबाबत राज ठाकरे यांना विचारलं असता, त्यांनी हे मत व्यक्त केले. रत्नागिरीत ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायमूर्तींनी आज पत्रकार परिषदेत घेऊन आपली भूमिका मांडली. सर्वोच्च न्यायालयात होत असलेल्या काराभारावर यावेळी न्यायमूर्तींनी नाराजी व्यक्त केली. देशाच्या इतिहासात प्रथमच न्यायमूर्तींनी पत्रकार परिषदेत घेऊन आपली खदखद व्यक्त केली. त्यामुळे देशात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारचा चांगलाच समाचार घेतला. भारताची लोकशाही धोक्यात असल्याचं मत महाराष्ट्र नवर्निमाण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. सरकारने किती गोष्टीत हस्तक्षेप केलाय हे या न्यायाधिशांच्या पत्रकार परिषदेतून व्यक्त होते. सरकार कुठल्या कुठल्या गोष्टीत नियंत्रण ठेवतय, आता तर न्यायालयावर सुद्धा नियंत्रण ठेवत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला. न्यायाधिशांना पत्रकार परिषद घ्यावी लागते भारताच्या इतिहासात हि पहिली घटना आहे. त्यामुळे त्या न्यायधिशांचा काय कोंडमारा झाला असेल ते बघा. त्यामुळे हा देश केवळ अडिज माणसे चालवत आहेत, त्यामुळे हे प्रकरण सरकाच्या चांगले अंगलटी येणार असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.
दरम्यान भीमा कोरेगाव प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर सडकून टिका केली आहे. या प्रकरणी अजून एकमेकांवर ढकळ लं जातंय. भिमा कोरेगाव प्रकरणात तोटा महाराष्ट्राचा झालाय. पण त्याचा फायदाच अनेकांना झाल्याचा आरोप राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच आपण अराजकतेकडे चाललो आहोत. यापुढे धार्मिक दंगली घडवल्या जातील असा गोप्य स्फोट राज ठाकरे यांनी केलाय. पुढच्या काही दिवसात देशात हिंदू मुस्लिम दंगली घडवल्या जातील असाही सुचक विधान राज ठाकरे यांनी केलं.