रत्नागिरी (आरकेजी): रत्नागिरी जिल्ह्यात आज अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, गुहागर या तालुक्यांत विजांच्या गडगटांसह मुसळधार पाऊस पडला. अचानक आलेल्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर आंब्याचंहि मोठे नुकसान झाले आहे.
गुरुवारी दुपारनंतर संपूर्ण जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. त्यातच गार वारे सुटल्याने हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला होता. काही ठिकाणी वादळहि सुरु झाले होते. त्यामुळेऔ पाऊस बरसणार अशी शक्यता होती. अखेर पावसाने हजेरी लावली. रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूणसह गुहागर तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. संगमेश्वरमधील नायरी, निवळी, कारभाटले,अंत्रवली, कळंबस्ते ते शास्री पुल परिसरात विजांच्या लखलखटा सह ढगाच्यां गडगडा सह अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या. अचानक पावसाच्या अागमनाने परिसरातील विज गायब झाली होती. दरम्यान ऊकाड्याने हैराण झालेल्या जनतेला या पावसाच्या गारव्याने थोडा दिलासा मिळाला असला, तरी आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याणे पुढील ६ तास वेगवान वारे आणि पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.