रत्नागिरी, (आरकेजी) : रत्नागिरी जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने मे महिन्यात कडक उन्हाळ्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मुंबई गोवा महामार्गावर रस्ता निसरडा झाल्याने वाहने घसरून अपघात होत आहेत. वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी नुकसान होत आहे. मासेमारीला गेलेल्या नौकाही किनाऱ्याव आल्या आहेत. समुद्र खवळलेला असल्याने मासेमारीसाठी जाणाऱ्या नौकांनी सुरक्षितता घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
वादळी वार्यासह पावसामुळे नुकसान
वादळी वार्यासह पावसामुळे जिल्ह्यात अनेकांचे नुकसान झाले आहे. पडवे गाव येथे संरक्ष भिंत कोसळून चार मजूर किरकोळ जखमी झाले आहेत. राम पवार, मच्छींद्र मोरे, बाळू गायकवाड, सुखदेव पवार अशी त्यांची नावे आहेत. त्यांना डेरवर यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार झाल्यानंतर घरी सोडण्यात आले.
मंडणगड तालुका मौजे पाचरळ येथे अशोक पाडुरंग साळवी यांच्या घराचे वादळी वाऱ्यामुळे ४३ हजार ९५० रुपयांचे नुकसान झाले. प्रसाद पाडूरंग बिर्जे यांच्या घराचे वादळी वाऱ्यामुळे १७ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले. मौजे घोसळे येथील प्रमोद राजाराम वेरुनककर यांच्या घराचे वादळी वाऱ्यामुळे ३८ हजार ९०० रुपयांचे नुकसान झाले आहे.
मौजे आंबवणे येथील सूमती सहदेव चाचले यांच्या घराचे वादळी वाऱ्यामुळे ७ हजार ५१० रुपयांचे, तर जयवंती शंकर फोपळे यांच्या घराचे वादळी वाऱ्यामुळे १० हजार ३१० रुपये नुकसान झाले आहे.
खेड तालुक्यातील कसवा नातू येथील दताराम बाबू चोगुले यांच्या घराचे वादळी वाऱ्यामुळे ४७ हजार ७०० रुपयांचे, तर आणखी १९ घराचे वादळी वाऱ्यामुळे १ लाख ४३ हजार २८१ रुपयांचं नुकसान झालं आहे.