
रत्नागिरी, (आरकेजी) : मान्सुनपूर्व पावसाच्या सरी आज दुसर्या दिवशीही जिल्ह्यात बरसल्या. रत्नागिरी आणि दापोली शहरात दुपारी जोरदार पाऊस पडला. २४ तासात जिल्ह्यात २ मिमि पावसाची नोंद झाली. संगमेश्वर आणि लांजा तालुक्यातही नऊ मिमि पावसाची नोंद झाली.
सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी अचानक शहरातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली. अरबी समुद्रात वाऱ्याचा वेग वाढल्याने मान्सुनपूर्व सरी पुढील काही तासात कोसळतील असा अंदाज मुंबई वेधशाळेने व्यक्त केला होता. मान्सुन सक्रीय होण्यासाठी कोकणात पोषक वातावरण निर्माण झाले आहे.