मुंबई : पूर्व उपनगरातील भांडुप, मुलुंडमध्ये आज शनिवारी मध्यरात्री 12 च्या सुमारास पावसाच्या सरी पडल्या. फक्त दहा मिनिटे पाऊस बरसला. वातावरणात कोणतीही चिन्हे दिसत नसताना अचानक पावसाने शिडकावा दिला. पावसामुळे वातावरणात थंडाव्या ऐवजी गरमी वाढली आहे.
शुक्रवारी दुपारपासून परिसरात वारे वाहत होते. आकाश ढगाळ होते. पाऊस येईल, अशी कोणतीही चिन्हे दिसत नव्हती. कोकणातही अधूनमधून मान्सूनपूर्व सरी बरसत आहेत. त्याचप्रमाणे पाऊस पडल्याची शक्यता आहे. शुक्रवारी मुंबईचे तापमान कमाल 34.5 तर किमान 29.0 असे होते. 31 मे ला गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज मुंबई हवामान खात्याने व्यक्त केला आहे.