
शक्ति वाले शाहीर सौ.तेजल पवार आणि तुरेवाली शाहीर सौ.प्रीती भोवड-वीर यांनी रसिकाना केले मंत्रमुग्ध
मुंबई (शांताराम गुडेकर )
विरार येथील भाऊसाहेब वर्तक हॉल मध्ये रेल्वे प्रवासी प्रगती मित्र मंडळ आयोजित अनाथ, अंध, अपंग आणि कर्णबधीर बालकांना विविध घटकातील मदती करीता कोकणातील जाकडी नृत्य सादर केले होते.या माध्यमातून दर वर्षी विविध गरजू मुलांना सहकार्य केले जाते.या वर्षी देखील शक्ती -तुरा रशिक प्रेक्षकानी हा हॉल तुडुंब भरला होता.पुन्हा एकदा हा कार्यक्रम हाऊसफुल केला गेला त्याबद्दल सर्वाचे आभार व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरवात मा.अध्यक्ष मनोहर गोताड यांच्याहस्ते रंग देवतेला श्रीफळ अर्पण करून,दीपप्रज्वलित करून श्री गणेश पूजन वरिष्ठ कृष्णा शिगवण व सुरेश यादव यांनी केले.तर छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला प्रणय नाडकर यांनी पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरवात झाली.शिस्तबद्द नियोजनाने सर्व मान्यवरांची मने हेरून घेतली. तर शक्ति वाले शाहीर सौ.तेजल पवार आणि तुरेवाली शाहीर सौ. प्रीती भोवड-वीर यांनी आपल्या कला सादर करताना रसिकांना मंत्रमुग्ध केले.या कार्यक्रमात देणगीदार व अनाथांचे नाथ म्हणून तीस मान्यवर उपस्थित होते.यात विधी ज्वेलर्सचे मालक परशुराम पारावे,महाराष्ट्र पोलीस अधिकारी जगन्नाथ चौघुले,समाजसेवक चंद्रकांत करंबेळे, शिवसेना पालघर जिल्ह्या प्रमुख पंकज देशमुख,समाज सेवक सुनीलजी भावेन सह तीस मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. तुरेवाली शाहीर रामचंद्र घाणेकर आणि शाहिर सौ.तेजल पवार व शाहिर सौ. प्रीती भोवड-वीर यांना ही सन्मानित करण्यात आले.तर याच क्षणी मंडळातर्फे सात विविध घटकांतील मुलांना मान्यवरांच्या हस्ते आर्थिक मदत करण्यात आली.
प्रगती मित्र मंडळ म्हणजे रोजची शिदोरी आणि जिंदगीची झोळी पाठीला लावून मुंबई लोकल ट्रेन मध्ये जीवघेणा प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांची नाळ जनसेवेसोबत जोडली गेली आणि प्रेरणास्थान कै.किसन काका दुर्गोवाले यांच्या संकल्पने १ जानेवारी २००७ रोजी प्रगती मित्रमंडळाच्या स्थापना झाली.ज्या लोकल मध्ये, पत्ते, झुगार, दादागिती, थट्टा मस्करी, आणि रोजच्या पार्ट्या होतात त्याची रेल्वेच्या चर्चगेट विरार सायंकाळी ६.३२ मिनिटाच्या एका डब्यात हे जनसेवेचे रोपटे मंडळाचे अनाथांचे नाथ अध्यक्ष मनोहरजी गोताड, गरिबांचे दैवत मंडळाचे सचिव परशुराम वाघरे आणि यांच्या नेतृत्वाखाली ५० सदस्यांच्या शिरावर असलेले सर्व जाती धर्माच्या सदस्यांनी १५ वर्षे हा मंडळाचा जनसेवाचा रथ चालवत असताना २०१० पासून स्वतःच्या खिशाला कात्री लावून आज पर्यंत नव्वद गरजू मुलांना विविध मदत केली गेली.यात काहींना गणवेश, काहींची शाळेची फी, काहींना व्हिलचेर, कोणाला कानाची मशीन, तर अनाथांना मदतीचा हात देण्यात आला आणि कोरोना काळात आणि महापुरात सढळ असते विशेष सहकार्य त्या स्थळी जाऊन केले. सूत्रसंचालन करताना ऍड. दिनेश शिंदे म्हणाले की, मायबाप रसीकप्रेक्षक आपण प्रेक्षक म्हणून या ठिकाणी आलात कोणी १५०/-रु. आणि २००/- रुपयांचे तिकीट घेऊन आपले मनोरंजन झाले.पण ते पैसे कोठेच वाया गेले नाही तेच पैसे अशा मुलांना मदतीसाठी उपयोगी आले.जे जीवनाशी संघर्ष करत आहेत.माझी हात जोडून विनंती आहे वर्षातून एकदा हे मंडळ असे कार्यक्रम राबवित असतात त्या वेळी नक्कीच प्रेक्षक नव्हे तर देवदूत म्हणून याना सहकार्य करण्या साठी वर्षोनुवर्षे साथ द्या… आपल्या मनोरंजनातून अनाथ मुलांच्या संगोपना साठी मदतीचा हात द्या. हे प्रगती मंडळ आपले सर्वांचे समजून रंजल्या गंजल्यांची साथ द्या असे संबोधित केले. शेवटी आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.















