नागपुर : नागपुर येथे किल्ले रायगड प्राधिकरणाची घोषणा मंगळवारी 19 डिसेंबर ला करण्यात आली असून त्याच्या अध्यक्षपदी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची निवड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
रायगडाचे संवर्धन योग्य प्रकारे होण्यासाठी तसेच पर्यटनाच्या दॄष्टीने जगाच्या नकाशावर रायगड येण्यासाठी शासनाच्या वतीने रायगड विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. या प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्याकडे सोपविण्यात आली असून सर्व शिवभक्तांच्या वतीने मी ही जबाबदारी स्विकारत आहे. रायगड हा आपल्या सर्वांचा असून रायगडाच्या संवर्धन कार्यात प्रत्येक शिवभक्तांचे योगदान मह्त्वाचे आहे अशी प्रतिक्रीया खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी याप्रसंगी व्यक्त केली. या समितीमध्ये रायगड जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी, कोकण आयुक्त जगदीश पाटील, प्रिंसिपल सेक्रेटरी टुरिझम आणि कल्चर नितीन गद्रे, माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख, ए. एस. आय. रिजनल जनरल डॉ. एम. नंबीराजन, ए. एस. आय. डिरेक्टर जनरल डॉ. उषा शर्मा, मॅनेजिंग डिरेक्टर एम. टी. डी. सी. विजय वाघमारे, कार्यकारी अधिकारी जि. प. रायगड अभय यावलकर, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, दुर्ग अभ्यासक भगवान चिले, रघूजी आंग्रे, इतिहास अभ्यासक राम यादव, सुधीर थोरात आदींचा सामावेश आहे.