रायगड, 12 जुलै :
ऐतिहासिक!
रायगडा वरील हत्ती तलाव पाण्याने भरला! जवळपास दीडशे वर्षानंतर तो पुर्णक्षमतेने भरला असेल, असे स्थानीक रहिवासी बोलत आहेत. छत्रपती संभाजीराजेंच्या अध्यक्षतेखाली ‘रायगड विकास प्राधिकरण’ च्या माध्यमातून रायगड किल्ल्याच्या जतन आणि संवर्धनाचे काम सुरू आहे.
या प्रकरणी संभाजीराजेंनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “असे क्षण जीवनात खूप कमी येतात! ज्याचं समाधान आयुष्यभर लाभतं. सर्व शिवभक्तांना सांगताना आनंद होत आहे, की रायगड प्राधिकरण च्या माध्यमातून आपण जे काही काम हाती घेतले, त्याला यश येत आहे. हत्ती तलावाचे 80% काम पूर्ण झाले असून तलावाला अजूनही एक जागेत गळती आहे. त्या गळतीचा व्यवस्थित अभ्यास करून ती सुद्धा काढून घेतली जाईल.”