अलिबाग : कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी आज रायगड किल्ला येथे महसूल अधिकारी, कर्मचारी व इतर विभागाचे शासकीय अधिकारी आणि स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्याने श्रमदान केले. यावेळी महाड प्रांत सुषमा सातपुते, महाडचे प्रभारी तहसिलदार सचिन गोसावी, श्रीवर्धन व पोलादपूर तहसिलदार तसेच महसूल मंडळ अधिकारी व तलाठी तसेच कोतवाल पुरातत्व खात्याचे अधिकारी व सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी तसेच स्वयंसेवक यांनी स्वच्छता मोहिमेत भाग घेतला.
एक दिवस रायगडसाठी दिल्याने त्यांनी रायगड जिल्हयातील महसूल कर्मचारी, इतर विभागाचे शासकीय अधिकारी, स्वयंसेवी संस्था यांचे अभिनंदन केले.