रायगड,दि.26 (जिमाका) :- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात 76 व्या प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात संपन्न झाले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) रविंद्र शेळके, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग जगदीश सुखदेवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने आदी मान्यवर व इतर अधिकारी,कर्मचारी, नागरिक, पत्रकार, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वप्रथम ध्वजारोहणानंतर पोलीस दलाच्या पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी 76 व्या प्रजासत्ताकदिनानिमित्त उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या.