अलिबाग, रायगड, 6 जून : जिल्ह्यात दि. 3 जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे मुख्यत: दक्षिण रायगडमधील तालुक्यांमध्ये घरे, शेती, फळझाडे इत्यादींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाकडून या गावांमध्ये तातडीने मदतकार्य सुरु करण्यात आले आहे.
येथील नागरिकांना अधिक मदत मिळण्यासाठी जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी, रायगड हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा अलिबाग येथे उघडण्यात आले असून त्याचा बचत खाते क्रमांक 38222872300 आहे.
जिल्हा प्रशासनाबरोबरच जिल्ह्यातील उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वयंसेवी संस्था, धार्मिक संस्था या रायगडमधील नुकसान झालेल्या नागरिकांना मदत करू इच्छितात, त्या सर्व कंपन्या, संस्था आणि नागरिकांनी “जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी, रायगड” या नावाने सुरु करण्यात आलेल्या बचतखात्यात सढळ हाताने मदतीची रक्कम जमा करावी असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.
या बचत खात्याची माहिती पुढीलप्रमाणे–
जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी, रायगड
(DISTRICT DISASTER RESPONSE FUND)
AC NO.:-38222872300
STATE BANK OF INDIA
IFSC CODE:- SBIN0000308