मुंबई : रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 11 लाखांचा धनादेश बँकेचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विधानभवन येथे सुपुर्द केला. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप नाईक उपस्थित होते.