अहमदाबाद : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या कारवर आज गुजरातमध्ये हल्ला झाल्याने देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. राहुल यांचा ताफा जात असताना अचानक त्यांना अज्ञात व्यक्तींकडून काळे झेंडे दाखवण्यात आले. तसेच कारवर दगडफेक करण्यात आली. यात कारची काच फुटली. राहुल यांना कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही. बनासकांठा जिल्ह्यातील रुनी गावात हा प्रकार घडला. गुजरातमधील पूरग्रस्तांच्या भेटीसाठी राहुल गांधीं दौरा करत होते.