मुंबई : भारतातील सर्वात झपाट्याने वाढत असलेल्या स्मार्टफोन ब्रॅंड रिअलमीने ‘रिअलमीपेसा’च्या लॉन्चसह आर्थिक सेवा क्षेत्रात पाऊल टाकले आहे. भारतीयांच्या विविध आर्थिक आवश्यकता पूर्ण करण्यासाठी रिअलमीपेसा कर्ज, बचत, पेमेंट आणि सुरक्षा संबंधी आर्थिक सेवा प्रदान करते. कंपनी १ लाख रुपयांपर्यंतच्या डिजिटल वैयक्तिक कर्जाची आणि ५ लाख पर्यंतच्या एसएमई कर्जाची सुविधा देते.
सोबतच कंपनी रिअलमीएक्स२ आणि रिअलमीबड्स एअरच्या लॉन्चसह टेक-लाइफस्टाइल ब्रॅंडच्या रूपात बाजारात आपली उपस्थिती भक्कम करत आहे. रिअलमीएक्स२ क्वालकॉम स्नॅपड्रॅग ७३०जी, ३०वॉट वीओओसी फ्लॅशचार्ज ४.०, आणि ६४ एमपी क्वाडकॅमे-याद्वारा संचालित आहे. याची किंमत १६,९९९/- रु. पासून सुरू होत आहे. रिअलमी बड्सएअरमध्ये १२ मिमी डायनॅमिक बास बूस्ट ड्राइयव्हर आहे जो १७ तासांचा प्लेबॅकटाइम आणि वायरलेस चार्जिंग देतो, ज्याची किंमत ३,९९९/- रु. आहे.
रिअलमी इंडियाचे सीईओ, श्री माधव शेठ म्हणाले, “रिअलमीपेसासह आमच्याकडे आर्थिक सेवांपर्यंत ग्राहकांची पोहोच सुलभ बनवून राष्ट्रव्यापी प्रभाव निर्माण करण्याची एक सुंदर संधी आहे. आमचे लक्ष्य मोबाइल व्यवसायात पुन्हा एकदा सफलता प्राप्त करण्याचे आहे आणि येत्या ५ वर्षात आर्थिक सेवा क्षेत्रात सर्वश्रेष्ठ ५ नवीन प्रवेशकांपैकी एक बनण्याचे आहे.”