मुंबई, (निसार अली) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे मालाड तालुकाध्यक्ष सुनील गमरे यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय, कांदिवली येथे सोमवारी शस्त्रक्रिया करण्यात आली. हे कळताच केंद्रिय सामाजिक न्यायमंत्री आयु. रामदास आठवले साहेब यांनी मालाड तालुकाध्यक्ष आयु. सुनिल गमरे यांच्या घरी जाऊन भेट देवून तब्येतीची विचारपुस केली. अनेकांनी फोन करून व प्रत्यक्ष भेटून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. यामध्ये समाजसेविका व नेत्यांचाही समावेश आहे.केंद्रिय सामाजिक न्यायमंत्री आयु. रामदास आठवले साहेब हे एक उत्तम नेतृत्व आहेत. समाजातील वरिष्ठ ते तळागळातील सर्वच कार्यकत्यांविषयी त्यांना काळजी असते. केंद्रिय सामाजिक न्यायमंत्री या उच्च पदावर असून देखील वरिष्ठ ते तळागळातील सर्वच कार्यकत्यांविषयी सामाजिक बांधिलकी ठेवणारे नेते आयु. रामदास आठवले साहेब आहेत.
प्रविन मोरे, गौतम सोनवणे,सिध्दार्थ कासारे, प्रकाश जाधव, हेमत रणपिसे, प्रकाश बनसोडे, संदीप शिंदे, शंकर वाकळे, अंबादास कांबळे, सुनिल मगर, गणेश सोनावणे, अमित तांबे, स्वप्निल गमरे, सुभाष सांवत, मंगेश टोम्पे, शरद बेटकर, महेश कांबळे, जितेंन्द्र जोगी, नंदा मोरे, संगीता सहजराव यांनीही प्रकृतीची विचारपुस करून लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.















