मुंबई, (निसार अली) : लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या राज्यातील सुमारे २० लाखांहून अधिक ऑटोरिक्षा चालक मालक व सुमारे दीड लाखांहून अधिक टॅक्सी चालक मालकांना आर्थिक फटका बसला आहेत. कर्ज घेतलेल्या ऑटोरिक्षा आणि टॅक्सीचा हप्ता कसा भरायचा असा मोठा प्रश्न राज्यातील रिक्षा-टॅक्सी चालकांना पडला आहे. लॉकडाऊनच्या परिस्थितीत शासनाने दिल्ली सरकारप्रमाणे राज्याच्या रिक्षा-टॅक्सी चालकांना आर्थिक मदत करण्याची मागणी सेवा सारथी ऑटोरिक्षा टॅक्सी व ट्रान्सपोर्ट युनियनद्वारे सरचिटणीस डी. एम.गोसावी यांनी राज्याचे मुख्यमंत्री व संबंधित खात्याला निवेदन मार्फत करण्यात आली आहे.
लॉकडाऊनमुळे खासगी आस्थापना, बाजारपेठा आणि शोरूम बंद असल्याने रस्त्यांवर शुकशुकाट आहे. राज्यभरातील ऑटोरिक्षा आणि टॅक्सीचे मीटर डाऊन आहेत. त्यामुळे ऑटो व टॅक्सी चालकांवर आर्थिक संकट आले असून ऑटोरिक्षा व टॅक्सी विकत घेण्यासाठी घेतलेल्या कर्जाचा मासिक हप्ता आणि कुटूंबाचे पोट कसे भरायचे असा दुहेरी प्रश्न ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांसमोर आहे. राज्यातील ऑटोरिक्षा ,टॅक्सी चालकांना आर्थिक मदत करण्याची मागणी सेवा सारथी ऑटोरिक्षा टॅक्सी व ट्रान्सपोर्ट युनियनचे सरचिटणीस डी.एम.गोसावी यांनी केली आहे