मुंबई : बंद काळात व परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत राज्य सरकारने सर्व रिक्षा टॅक्सीचालक मालकांची जबाबदारी घ्यावी व प्रत्येकी १० ,००० / – रु . दरमहा त्यांना आर्थिक सहाय्य दयावे, अशी सिटू या कामगार संघटनेने केली आहे.
राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणारा व्यवसाय म्हणजे रिक्षा – टॅक्सी वाहतूक व्यवसाय आहे. या व्यवसायावर अनेक नागरिक , तरुण आपल्या कुटुंबीयांची उदरनिर्वाह करीत आहेत . मात्र २३ एप्रिलपासून लॉक डाऊन लागू केल्यानंतर कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे . किमान कोरोना साथीच्या काळात त्यांना मदत करावी अशी मागणी करण्यात येत आहे . अनेक बेरोजगार युवक नोकरी मिळत नाही म्हणून या व्यवसायात येतात. अनेकांनी व्यवसाय सुरू करण्यासाठी बँक फायनान्स , सावकार यांचे कर्ज काढून रिक्षा – टॅक्सी घेतल्या साहेत . दुसरे कुठलेही उत्पन्नाचे साधन नाही , कुटुंब जगायचे कसे असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे, असे सिटूने राज्यसकारच्या निदर्शनास आणून दिले आहे.