मुंबई, (नवनाथ मोरे) : महाराष्ट्रात प्रबळ विरोधी पक्ष नाहीये. त्यामुळे विरोधी पक्षाची पोकळी राज्याच्या समाजकारणात निर्माण झाली आहे. विरोधी पक्ष म्हणून ज्या पक्षाला मान्यता मिळालीय, तो राजकारण करण्यात गुंतलाय. आज राज्यावर कोरोना या महामारीचे संकट आहे. या काळात विरोधी पक्षाची भूमिका कशी असावी, याचा आदर्शच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने राज्यासमोर आखून दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाविरोधात लढा सुरुच आहे. हा लढा लढत असताना सर्वसामान्यांचे प्रश्न ठाकरे सरकारसमोर समाजकारणीय भूमिकेतून मांडण्याचे कार्य मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि त्याच्याशी सबंधित संघटना करत आहेत. नागरिकांचे प्रश्न सुटावेत म्हणून विविध निवेदनं, सूचना दिल्या जात आहेत.
विद्यार्थी, कामगार, महिला यांच्यासह वंचित घटकांना लॉक डाउन काळात जे प्रश्न भेडसावत आहेत. ते सरकारसमोर मांडण्याचे काम माकपकडून होत आहे. यामुळे राज्याच्या समाजकारणातील एक प्रबळ विरोधी पक्ष म्हणून माकपने भक्कम स्थान मिळवले आहे.
लॉकडाउन काळात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि संलग्न संघटनानी दिलेली निवेदनं, भूमिका आणि सूचना :
- राज्यात संपूर्ण दारूबंदी करण्याची सिटूची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी…
- करोना आजाराचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने प्रभावी पावले उचलण्याची गरज….टाळ्या वाजवून थाळी वाजवून रोगाचा फैलाव रोखता येणार नाही – सीटू
- बांधकाम कामगारांना तातडीने आर्थिक मदत देणे बाबत. – सीटू
- माकप ची बदनामी करणारे संबित पात्रा, सुनील देवधर व इतरांवर कायदेशीर कारवाई करणार – माकप
- मच्छीमारांना उपाययोजना करून मदत करावी – आ. विनोद निकोले यांची मुख्यमंत्री व मत्स्यव्यवसाय मंत्री यांच्या कडे मागणी
- सिटूचे मुंबई जिल्हा अध्यक्ष काॅ के नारायणन यांच्यावर पोलिसांनी वापरलेल्या दमनतंत्राचा निषेध – माकप
- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे पालघरच्या मॉब लिंचिंगचा तीव्र निषेध, दोषींवर कडक कारवाई आणि सखोल चौकशीची मागणी, आरएसएस-भाजपच्या धर्मांध रंग देण्याच्या प्रयत्नाचा आणि शुद्ध खोटारडेपणाचा धिक्कार
- महाराष्ट्रातील कंत्राटी व हंगामी, तासिका तत्वावर काम करणाऱ्या शिक्षक, प्राध्यापकांना राज्य सरकारने लॉकडाऊन च्या काळात आर्थिक मदत द्यावी – डी वाय एफ आय
- वडवणी तालुक्यात कापूस, तूर , हरभरा खरेदी केंद्र तात्काळ सुरू करा – माकप(वडवणी)
- स्थलांतरित मजुरांना त्यांचे राज्यांमध्ये जाण्यासाठी करावयाच्या व्यवस्थेबाबत
- Lockdown मुळे उपासमारीची वेळ आलेल्या आदिवासी कुटुंबियांना तात्काळ मदत मिळणे बाबत – AIKS
- राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे तात्काळ वितरण करा – एसएफआय
- रेशनिंगविषयी व रोजगार हमीची कामे सुरू करण्याबाबत मा . जिल्हाधिकारी , पुणे यांना किसान सभा जिल्हा समितीचे निवेदन – AIKS pune
- गंजमाळ झोपडपट्टीतील आगीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांचे पुनर्वसन करणे बाबत व त्यांना आर्थिक सहाय्य आणि निवासाची सोय करणे बाबत – CITU नाशिक
- अधिकृतरित्या ऑनलाईन शिकवणी नको – एसएफआय
- राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे तात्काळ वितरण करा – एसएफआय
- आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र मुंबईहून गुजरात मध्ये नेण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाला सीटूचा तीव्र विरोध
- राज्यातील सेवेत असलेल्या सर्व वैद्यकीय विद्यार्थ्यांना संपूर्ण आवश्यक आरोग्य साहित्य, आरोग्य संरक्षण व आरोग्य विमा द्या तसेच आर्थिक मदत जाहीर करणे बाबत. – एस एफ आय
- कोव्हीड-१९ लॉकडाऊनमुळे राज्यातील पदवी व पदव्युत्तर विभागाच्या परीक्षा पुढे ढकलणे संबंधी – एस एफ आय
- करोना संकट हाताळण्यात बाबत केंद्र सरकारची निष्क्रियता, उदासीनता व हडेलहप्पी धोरणाविरुद्ध सिटू कामगार संघटनेचा 21 एप्रिलला निषेध दिन
- 20 एप्रिल 20 पासून महानगरपालिका व नगरपालिका हद्दीबाहेरील व ग्रीन ,ऑरेंज मधील उद्योग व व्यवसाय सुरू करण्याबाबतच्या निर्णयाबाबत
- मुंबईतील राज्याबाहेरील व राज्यांतर्गत स्थलांतरित नागरिक व कामगारांना दिलासा देणेबाबत – सीटू
- विरोधी मत मांडणाऱ्यांना आणि अल्पसंख्यकांना लक्ष्य करणे बंद करा – महिलांची मागणी
- ऊसतोडणी कामगारांना त्यांच्या गावी जाण्याबाबत निर्णय करणे बाबत – सीटू
- जनतेला दिलासा देण्यासाठी ठोस निर्णय घ्या ….
- गरजुना रेशन दुकानातून अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करा….
- आयकर न भरणाऱ्या नागरिकांना प्रत्येकी पंचवीस वर्षाच्या आतील तरुण तरुणींना 5000 रुपये व 25 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्याना 10000रुपये आर्थिक सहाय्य द्या – सीटू
- रेशन कार्ड धारक नसलेल्या स्थलांतरित कामगारांना व अन्य नागरिकांना रेशन मिळणे बाबत…
- राज्यातील रिक्षा टॅक्सी चालक मालक कुटुंबांना दरमहा १० , ००० आर्थिक सहाय्य द्या
- विद्यापीठ परिसर,विद्यापीठ उपकेंद्र आणि विद्यापीठ संलग्नित सर्व संस्था- महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षा फॉर्म भरण्यास स्थगिती मिळणेबाबत तसेच परीक्षा शुल्क भरलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत(Refund)मिळणे बाबत – SFI औरंगाबाद
- बांधकाम कामगारांना तातडीने आर्थिक मदत देणे बाबत. – सीटू
- महामारीच्या काळात वंचित घटक आणि गरजू महिलांना राज्य सरकारतर्फे त्वरित मदत करा-अ.भा.जनवादी महिला संघटना
- राज्यातील साखर कारखाने लॉक डाऊन करा – कामगार नेते डॉ. डी.एल.कराड
जनता दल सेक्युलरही मांडतोय विविध प्रश्न
जनता दल सेक्युलरही राज्यात जे विविध प्रश्न निर्माण झाले आहेत, ते सुटावेत यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी राज्यसरकारसमोर प्रश्न मांडले जात आहेत. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राचे मुख्यालय गांधीनगरला नेण्याच्या निर्णयाचा जनता दलाने निषेध करून हा निर्णय कसा चुकीचा आहे याचे विश्लेषण केलेले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर नियुक्ती करण्याबाबतचा राज्यपालांना पत्र लिहिले आहे. दारिद्र्याच्या छटा शोधू नका; सरसकट सर्वांना धान्य पुरवठा द्या, अशी मागणी पक्षाने केली होती. आंबा उत्पादक अडचणीत आलाय; हापूसच्या वाहतुकीसाठी एसटीचा वापर करा अशी सूचना’ जनता दलाने राज्य सरकारला केली होती.