मुंबई : कोकण-गोव्यामधील काही भागातील कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागातील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. ४ एप्रिलपर्यंत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ तर कोकण-गोव्यात किंचित घट झाली आहे.
राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अकोला येथे ४४.० अंश सेल्सिअस तर सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे २०.४ इतके नोंदवले गेले.
गेल्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले किमान तापमान (अंश सेल्सिअस) खालीलप्रमाणे:
मुंबई (कुलाबा) ३३.२/२५.८, सांताक्रुझ ३३.५/२४.०, अलिबाग ३४.१/२५.०, रत्नागिरी ३२.२/२५.३, पणजी (गोवा) ३३.५/२६.१, डहाणू ३३.७/२४.४,भिरा- /२५.५, पुणे ३९.७/२१.६, अहमदनगर ४१.८/-, जळगाव ४२.२/२४.५, कोल्हापूर ३६.१/२३.९, महाबळेश्वर ३२.६/२०.४, मालेगाव ४२.०/२४.६, नाशिक ३९.९/२१.८, सांगली ३७.७/२४.१, सातारा ३८.३/२३.४, सोलापूर ४०.७/२५.६, उस्मानाबाद ३८.७/-, औरंगाबाद ४१.१/२४.४, परभणी ४२.३/२४.१, नांदेड ४२.५/-, बीड ४१.०/-, अकोला ४४.०/२३.६, अमरावती ४३.०/२४.८, बुलढाणा ४०.०/२७.२, ब्रह्मपुरी ४३.१/२५.३ चंद्रपूर ४३.२/२६.४, गोंदिया ४०.६/२४.०, नागपूर ४३.३/२२.९, वाशिम ३९.६/२४.२, वर्धा ४३.६/२३.०, यवतमाळ ४२.५/२५.४.