रत्नागिरी, (आरकेजी) : गुहागर येथील समुद्रात रविवारी सकाळी बुडालेल्या बारा वर्षांच्या पुष्कराजचा मृतदेह तब्बल ४८ तासांनी सापडला. आज सकाळी अंजनवेल समुद्रकिनारी मृतदेह हाती लागला.
पुष्कराज आपल्या कुटुंबासह गुहागर समुद्र किनार्यावर पोहायला आला होता. पोहोताना ओहोटीच्या पाण्याबरोबर तो खेचला गेला. दोन दिवस उलटले तरी तो सापडत नव्हता. पुष्कराजचे वडील राजाराम पाटील नातेवाईक, स्थानिक तसेच पोलिसांच्या मदतीने जिल्ह्यातील समुद्रकिनार्यावर जाऊन शोध घेत होते. वेलदुर ते हेदवीपर्यंत पुष्कराजचा शोध घेण्यात आला. अखेर अंजनवेल समुद्रकिनार्यावर मृतदेह सापडला.
पुष्कराज मुळचा सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातल्या बहे गावाचा होता.