मुंबई (शांताराम गुडेकर) : चेंबूर येथील आर.सी.एफ कर्मचारी वर्गाच्या पंचरत्न मित्र मंडळाने जाहीर केलेले राष्ट्रीय महानायक पंचरत्न पुरस्कार-२०१७, राज्यस्तरीय संजीवन पंचरत्न पुरस्कार-२०१७, आंतरराष्ट्रीय विश्वनायक पंचरत्न पुरस्कार-२०१७ वितरण सोहळा व डॉ. विनित गायकवाड यांचा विशेष सत्कार आणि विद्यार्थी-विद्यार्थींचा गौरव रविवारी १९ नोव्हेंबर रोजी परळ येथील शिरोडकर हॉलमध्ये करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार नरेंद्र मेहता, पनवेलच्या उपमहापौर चारुशिला घरत, शिवसेना नगरसेवक मंगेश सातमकर, आर.सी.एफ अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक उमेश धात्रक, अभिनेता उमेश मिटकरी, अभिनेत्री दिपिका पाटील, प्रसिध्द गायक दादुस संतोष चौधरी, जगदीश पाटील, कविता शिंकतोडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत राहणार आहेत.
मुक्त व्यासपीठ कोकण कट्टा संस्थापक अजित पितळे, समाजसेवा पुरस्कार-२०१७ साठी राजेंद्र भुवड, दिपक कारकर यांची तर पत्रकारिता व वृत्तपत्रलेखक पुरस्कार-२०१७ साठी सुभाष कोकणे, केतन भोज यांचा तसेच कविता शिंकतोडे, उमेश मिटकरी, संतोष चौधरी, आबासाहेब गावडे, प्रसाद तारकर, सागर नटराज, संतोष घरत, राजेंद्र सावंत, रामदास शिर्के, शांताराम खानविलकर, प्रकाश मोहीते, विलास वानखेडे, रमेश लांडगे, महेश सावंत, दिपीका पाटील, चारुशिला घरत, जगदीश पाटील, रत्नप्रभा घरत, सचिन सरडा, जालिंदर खंडागळे, रमेश माने, श्रीरंग पाटील, निता माळी, विक्रांत पाटील, ब्रम्हदेव सरडे, सुहासिनी केंकाणे, राहुल कुमार, राजेश्री चौधरी, प्रकाश आंबेकर, पुरी शारदा, सुदेश दळवी, शिवाजी जाधव, हर्षल पाटील, आप्पा करमकर, सुहास पाटील, काशिनाथ राठोड, सुनिल अवसार, भावना शिर्सेकर, काशिनाथ भोंडगे, विजय चव्हाण, सिंकदर अन्सारी, एस. आर. एमडी शरिफ, राजेश मोरे, पांडुरंग लांडगे, काशिनाथ पारठे, प्रमोद तरळ, ज्ञानेश्वर गुरव, मोशीम कुरेशी, विजय यादव, मनारी ट्रेंडर, रमेश सरभाटे, भारती जगताप यांचा सत्कार करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये शुभम डिचोलकर, तपस्या वायदंडे, अक्षता भोईर यांचा यावेळी गौरव करण्यात येणार आहे. या पंचरत्न पुरस्कार-२०१७ वितरण सोहळ्याला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष अशोक भोईर, सचिव प्रदिप गावंड यांनी केले आहे.