
मुंबई, (निसार अली) : साकीनाका येथील समता विद्या मंदिर येथील शाळेतील विद्यार्थी, शिक्षक,रात्र शाळेतील विद्यार्थी आणि संस्थेच्या वतीने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात बाधित झालेल्या पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पन्नास हजार रुपयांचा धनादेश समता विद्या मंदिर शाळेचे कार्यकारी अध्यक्ष राजेश सुभेदार यांनी दिनांक 13 ऑगस्ट रोजी, राष्ट्र सेवा दलाचे मुंबईचे कार्याध्यक्ष शरद कदम यांच्या कडे सुपूर्द केला.
राष्ट्र सेवा दलाने इचलकरंजी, मिरज, गडहिंग्लज येथे पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्या दिवसापासून काम सुरू केले आहे. राष्ट्र सेवा दलाच्या अनेक उपक्रमात साकीनाका येथील समता विद्या मंदिर आणि डॉ. राम मनोहर लोहिया रात्र शाळेतील विद्यार्थी, शिक्षक सहभागी होत असतात. सेवा दलाने पूरग्रस्त भागात जे काम सुरू केले आहे. त्या कामात मदत व्हावी, असे या संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष आणि राष्ट्र सेवा दलाचे सैनिक राजेश सुभेदार यांनी यावेळी सांगितले.















