कोल्हापूर : एसएफआय ने पुरग्रस्त भागातील सर्व प्रकारचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणी केली आहे.
शिवाजी विद्यापीठाने चालू शैक्षणिक वर्षातील प्रथम सत्राची परिक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु फक्त परिक्षा शुल्क माफ न करता सर्व प्रकारचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यासाठी एसएफआय लढणार आहे. पुरग्रस्त भागातील परिस्थितीचा विचार करता विद्यार्थीहिताचा निर्णय घेणे गरजेचे आहे.
एसएफआय विद्यार्थ्यांचे सर्व प्रकारचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याच्या मागणीला घेऊन १६ सप्टेंबर रोजी मोर्चा काढणार आहे. शेतकरी, कामगार, महिला, विद्यार्थी यांचा संयुक्त मोर्चा मोठ्या संख्येने निघणार आहे.
विद्यापीठाने घेतलेला निर्णय स्वागतार्ह असला तरी सर्व प्रकारचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, ही एसएफआयची मागणी आहे.
राज्य सचिवमंडळ सदस्य नवनाथ मोरे, जिल्हाध्यक्ष पंकज खोत, जिल्हा सचिव सर्वेश सवाखंडे, जिल्हा उपाध्यक्ष हरी आवळे, जिल्हा सहसचिव प्रेरणा कवठेकर, प्रमोद मोहिते, विनय कोळी, गणेश भालेराव, केतन पाटील, रत्नदिप सरोदे आदी स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडिया कोल्हापूर जिल्हा कमिटीकडून मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.