मुंबई आयरोबोट या आघाडीच्या जागतिक रोबो व्हॅक्यूम ब्रॅंडचे अधिकृत वितरक प्योरसाइट सिस्टम्स प्रा. लि.ने आपली विविध हाय-एंड रोबोटिक व्हॅक्यूम क्लीनर उत्पादने अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टसह भागीदारी केली आहे. ग्राहक आपली आवडती रूम्बा आणि ब्राव्हा उपकरणे फ्लिपकार्टच्या वेबसाइटवरून आणि मोबाइल अॅप्लिकेशनवरून मागवू शकतील.
प्योरसाइट सिस्टम्स प्रा. लि. चे प्रवक्ता पुलक सतीश कुमार म्हणाले, “भारताच्या आघाडीच्या ई-कॉमर्स मंचाशी भागीदारी करताना आम्ही उत्साहित आहोत. आम्ही काही काळापासून फिल्पकार्टशी हातमिळवणी करण्याचा विचार करत होतो, कारण भारतीय ई-कॉमर्सच्या क्षेत्रातील ते एक स्थिर नाव आहे. आम्हाला विश्वास आहे की, या भागीदारीमुळे आयरोबोट ची ऑनलाइन उपस्थिती वाढवायला आम्हाला मदत होईल आणि आम्ही अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचू शकू. गेल्या वर्षी आम्ही आमची ऑफलाइन पोहोच वाढवण्यासाठी क्रोमा स्टोअरशी भागीदारी केली आहे.”