
मुंबई : आघाडीचा जागतिक रोबो-व्हॅक्यूम ब्रॅंड आयरोबोटचे अधिकृत वितरक प्योरसाइट सिस्टम्सने ख्रिसमसच्या मोसमात निवडक रूम्बा उपकरणांवर आकर्षक सवलती जाहीर केल्या आहेत. रूम्बा ९६६, ९६०, आय७ आणि आय७+ च्या प्रत्येक खरेदीसोबत ग्राहकांना अॅमेझॉन अॅलेक्सा ईको डॉट अगदी मोफत मिळेल. प्योरसाइट सिस्टम्सने रूम्बा ई५ आणि ब्राव्हा ३९०टीसाठी कॉम्बो ऑफर आणली आहे ज्याद्वारे ही उपकरणे ७८,८०० ऐवजी ५९,९०० रुपयात उपलब्ध होतील.
तसेच रूम्बा आय७+ हे आयरोबोटचे एक प्रमुख उत्पादन भारतात उपलब्ध झाले असून याची मूळ किंमत ९९,९०० रुपये आहे, मात्र सध्या ते भारतीय ग्राहकांकरिता प्रास्ताविक मूल्य ८९,९०० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. घराचा फ्लोर प्लान समजण्याची, लक्षात ठेवण्याची व त्यास अनुकूल बनून काम करण्याची क्षमता असलेल्या क्लीन बेस तंत्रज्ञानाने सुसज्ज रोबो ऑटोमेटेड व्हॅक्यूम क्लीनर्सच्या विश्वात इंटेलिजन्सला नवीन पातळीवर घेऊन जातो. आय7+ कटकटींपासून मुक्त सफाईचा अनुभव देतो.
ही विशेष सवलत भारतात आयरोबोट स्टोर्स आणि आयरोबोटडॉटइन, अॅमेझॉन आणि क्रोमा स्टोर्समध्ये उपलब्ध आहे.















