
चिपळूण : माहिती व तंत्रज्ञानाच्या युगातील विद्यार्थी, शिक्षक आणि प्राध्यापकांची समतावादी संघटना असलेल्या इंडियन स्टुडंट कौन्सिलच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी २०२६-२७ या वर्षासाठी सहकार क्षेत्रातील कामगिरीची दखल घेऊन ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज सहकार क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कार सौ. स्वप्ना प्रशांत यादव यांना जाहीर करण्यात आला आहे.
हा पुरस्कार दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण येथे दुपारी ४:०० वाजता माजी खासदार हुसेनभाई दलवाई यांच्या प्रमुख उपस्थितीत व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.
यापूर्वी इंडियन स्टुडंट कौन्सिलतर्फे अभिनेते संजय खापरे, एबीपी माझाच्या उपकार्यकारी संपादिका सरिता कौसिक, अभिजीत हेगशेट्ये, अभिनेते मकरंद अनासपुरे, अभिनेत्री चिन्मयी सुमित, डॉ. दीपक चिद्दरवार, डॉ. सम्राट माने, अभिनेते हर्षद शिंदे,डॉ.आशीर्वाद लोखंडे तसेच अनिल कलकुटकी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे, अशी माहिती इंडियन स्टुडंट कौन्सिलचे अध्यक्ष प्रा. डॉ. ज्ञानोबा कदम यांनी दिली.
यावेळी प्रा. माधुरी राऊत, डॉ. माधवी महाके, डॉ. मीता रामटेके, प्रा. डॉ. रेखा बडोदेकर, प्रा.डॉ.रजनी महेशकर, प्रा.डॉ. संयोगिता सासणे, डॉ. अनिता पाटील, सारिका शिंदे, सुवर्णा शिंदे, कॅप्टन मोहन गुजरकर, अश्विनी दीक्षित, सोनिया इथापे, डॉ. कल्पना शिंदे, अंजली कुंदर्गी, प्रा. रूपेश भालेकर प्रा. दिपाली कु-हाडे, मीना राजेंद्र साळुंके, श्रुती कांबळे उपस्थित होते.














