रत्नागिरी: कोरोना महामारीमुळे मरगळलेल्या साहित्यिक विश्वाला उभारी आणण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) रत्नागिरी शाखेतर्फे कथा, कविता आणि ललित लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभला. यातील विजेत्यांना येत्या रविवारी (ता. २८) सायंकाळी ५ वाजता गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. या वेळी विनायक हातखंबकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.
काव्य स्पर्धेसाठी कोरोना काळ, कथा लेखनासाठी कोरोना काळातील मानवी मनाच्या अवस्था तसेच ललित लेखनासाठी कोरोना आधी आणि नंतरचे समाजजीवन असे विषय देण्यात आले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील लेखक आणि कवींनी या स्पर्धेला अतीशय उत्तम प्रतिसाद दिला. या स्पर्धेमधील प्रत्येक साहित्य प्रकारामध्ये प्रथम क्रमांकासाठी १००० रुपये आणि प्रमाणपत्र, द्वितीय ८०० रुपये आणि प्रमाणपत्र आणि तृतीय ५०० रुपये आणि प्रमाणपत्र असे बक्षिस देण्यात येणार आहे.
ललित लेखन स्पर्धे प्रथम क्रमांक योगीनी भागवत, द्वितीय जान्हवी फडके, तृतीय सानिका तळेकर, उल्लेखनीय पारितोषिक सौ. सविता बर्वे (सर्व रत्नागिरी), यांना प्राप्त झाले आहे. कथा लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक विस्मया कुळकर्णी (रत्नागिरी), द्वितीय रुपाली पाटील (खेड), तृतीय राधा रायकर, (चिपळूण) यांना मिळाले. काव्य लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक निलिमा इंदुलकर (रत्नागिरी), द्वितीय रुपाली पाटील (खेड), तृतीय विनायक जोशी (चिपळूण) यांनी यश मिळवले. या सर्वांचा सन्मान रविवारी मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.