मुंबई : पुराणिक बिल्डर्स या रिअल इस्टेट क्षेत्रातल्या अग्रेसर समुहाने ठाणे शहरातील वर्तक नगरात नव्या पुराणिक ग्रॅण्ड सेंट्रल या फ्लॅगशीप प्रकल्पाची अधिकृत घोषणा केली. अनेक टॉवर्स या प्रकल्पांतर्गत बांधण्यात येत आहेत. या टॉवर्समध्ये १ व २ बीएचके सदनिका अनुक्रमे ४६१ चौ. फूट ते ६७३ चौ. फूट आकारमानाच्या बांधण्यात येत आहे. किंमती अंदाजे ८९ लाख ते १.२ कोटी रुपयांच्या दरम्यान ठरवण्यात आल्या आहेत.
पुराणिक बिल्डर्सची खासीयत असलेल्या सर्व सुखसोयी येथे देण्यात येत आहेत. यात डबल-हाईट एण्ट्रन्स लॉबी,स्मार्ट कार्डावर आधारित बहुमजली स्वयंचलित कार-पार्किंग सुविधा, अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था, प्रिमीयब क्लब मेंबरशीप आदी सोयींचा समावेश आहे. शहरातल्या आधुनिक कुटुंबांसाठी `ग्रॅण्ड जीवनशैली` विकसित करण्यासाठी या सुविधा एकत्र आल्या आहेत.
अत्याधुनिक सुविधा आणि चांगली कनेक्टिव्हिटी असलेला पुराणिक ग्रॅण्ड सेंट्रल हा प्रकल्प धोरणात्मक रितीने विशिष्ट ठिकाणी उभारण्यात येत आहे. ग्राहकांना कायमच सर्वोत्कृष्ट उत्पादने देण्याचा पुराणिक बिल्डर्सचा प्रयत्न असतो. ग्राहकांना दर्जेदार जीवनशैली आणि उत्कृष्ट राहणीमान देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असे पुराणिक बिल्डर्स प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक शैलेश पुराणिक म्हणाले.
पुराणिक ग्रॅण्ड सेंट्रल हा प्रकल्प विशेष महत्वाचा ठरतो. कारण विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे माहेरघर असलेला ठाण्यातला उपवन तलाव या प्रकल्पापासून हाकेच्या अंतरावर आहे. वनस्पती उद्याने असलेला येऊर डोंगर किंवा पारसिक हील्स भागही येथून जवळ आहे. निसर्गसौंदर्यासोबतच, ठाण्यातील कोरम मॉल, विवियाना मॉल तसेच, अनेक शिक्षणसंस्थाही या प्रकल्पाच्या जवळ आहेत. सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल, वसंत विहार स्कूल, सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल आणि आर. जे. ठाकूर कॉलेज या शैक्षणिक संस्था, एसबीआय, आयसीआयसीआय, एचडीएफसी आदी बॅंका तसेच, ज्युपिटर रुग्णालय, वेदांत रुग्णालय आदी वैद्यकीय सेवाही या प्रकल्पापासून काही पावलांच्या अंतरावर आहेत.
पुराणिक ग्रॅण्ड सेंट्रलची कनेक्टिव्हिटीही फार चांगली आहे. पूर्व दृतगती महामार्ग तसेच, घोडबंदर रोड येथून मुंबईच्या पूर्व व पश्चिम उपनगरांत या प्रकल्पातून जाणे फार सोयीचे आहे. तसेच, ठाणे स्थानकापासूनही हा प्रकल्प जवळ आहे.
याव्यतिरिक्त, घोडबंदरवरून जाणारी वडाळा- कासारवडवली मेट्रो यासारखे विविध इन्फ्रास्ट्रक्चरशी संबंधित आगामी प्रकल्पही या प्रकल्पापासून जवळ आहेत. वर्तक नगरपासून केवळ १०० मीटर अंतरावर असलेल्या कॅडबरी जंक्शनपासून हा प्रकल्प केवळ १० थांब्यांच्या अंतरावर आहे. सध्या ठाणे- दिवा रस्ता, भिवंडी बायपासवरील उड्डाणपूल, कल्याण ते मिरा-भाईंदर हा मेट्रो ३ प्रकल्प, ठाणे – कल्याण मोट्रो प्रकल्प या विविध प्रकल्पांमुळेही हा निवासी प्रकल्प राहण्यासाठी अत्यंत सोयीस्कर होणार आहे.