
रत्नागिरी, प्रतिनिधी : चिपळूणमध्ये पाऊस आणि पुराने हाहाकार उडवला आहे. 2005 पेक्षाही गंभीर परिस्थिती आहे. संपूर्ण शहर पाण्याखाली गेलं आहे.
दरम्यान हायटाईड व अतिवृष्टी वेळ एकत्र आल्यामुळे खेड व चिपळूण मध्ये गंभीर परिस्थिती आहे. स्थानिक चिपळूण नगरपालिकेच्या 2 बोटीद्वारे रेस्क्यू ऑपरेशन सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसेच रत्नागिरी मधून 1 , पोलीस विभागाकडील 1 व कोस्टगार्ड ची 1 बोट अश्या 3 बोटी रेस्क्यू ऑपरेशनसाठी पाठविण्यात आल्या आहेत.
पुणे हुन NDRF च्या दोन टीम पुणे ( खेड साठी 1 व चिपळूण साठी 1)येथून रेस्क्यू ऑपरेशनसाठी निघालेल्या आहेत. तटरक्षक रक्षक दलाला हेलिकॉप्टर मदतीसाठी समन्वय करणेत येत असून, प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करणेत येत असल्याची माहिती जिल्हा
प्रशासनाकडून देण्यात आली आहे..















