~ नवीन प्रकल्पांची संख्या २०१५ च्या स्तरावर पूर्ववत ~
मुंबई, ३० जून २०२२: आर्थिक स्थैर्यामुळे घर खरेदी करणाऱ्यांना त्यांच्या आर्थिक स्थितीबद्दल अधिक आत्मविश्वास आल्यामुळे निवासी जागांना असलेली मागणी आघाडीच्या आठही शहरांमध्ये वाढली आहे. घरांची विक्री व नवीन पुरवठा यांमध्ये एप्रिल-जून २०२० सकारात्मक वाढीची नोंद झाली.
रिअल इनसाइट रेसिडेन्शिअल- एप्रिल-जून २०२२ या अहवालानुसार, भारतातील आघाडीच्या आठ निवासी जागांच्या बाजारपेठांचे तिमाही विश्लेषण REA चे पाठबळ असलेल्या PropTiger.com द्वारे केले जाते. मालमत्तेच्या किमतींमध्ये अलीकडेच झालेल्या वाढींचा घर खरेदी करणाऱ्यांच्या इच्छेवर फारसा परिणाम झालेला नाही असे कोरोनाविषाणू साथीनंतरच्या टप्प्यातील एकूण आर्थिक चित्र व उत्पन्नाच्या स्थैर्यात झालेली सुधारणा यांवरून दिसून येते.
या अहवालात अभ्यासण्यात आलेल्या बाजारपेठांमध्ये अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, मुंबई महानगर प्रदेश, दिल्ली- राजधानी परिसर व पुणे यांचा समावेश होतो.
Housing.com, PropTiger.com आणि Makaan.com यांचे ग्रुप सीएफओ श्री. विकास वाधवान यांनी सांगितले की, “आरबीआयने पहिल्या तिमाहीदरम्यान दोनदा रेपो दरात वाढ करून तो ४.९० टक्क्यांवर आणला असला, तरीही विश्लेषण केलेल्या कालखंडादरम्यान गृहकर्जे प्रामुख्याने परवडण्याजोगी राहिली आहेत. घरांच्या मागणीत होत असलेल्या वाढीमागील सर्वांत मोठा घटक म्हणजे स्वत:च्या मालकीची मालमत्ता असण्याला वाढीव महत्त्व प्राप्त झाले आहे आणि त्याला ग्राहकांचा एकूण आर्थिक परिस्थितीबाबतचा आत्मविश्वास व उत्पन्नातील स्थैर्य यांची जोड मिळाली आहे.”