मुंबई : नन्ही कली तर्फे किशोरवयीन मुलींवर आधारित अहवाल लाँच करण्यात आला आहे.
तरुण स्त्रियांसाठी शिक्षण, आरोग्य आणि अर्थाजनाच्या संधीमध्ये गुंतवणूक केल्यास त्याचे अतिशय सामर्थ्यवान पडसाद उमटतात व त्याचा फायदा भविष्यातील पिढ्यांना होतोच, शिवाय अर्थव्यवस्था आणि समाजावर सकारात्मक परिणाम होतो. आज भारतात ८० दशलक्ष किशोरवयीन मुली आहेत. मात्र, या मुलींचे आयुष्य, त्यांची स्वप्न, आकांक्षा काय आहेत, त्यांना सुरक्षित आणि सन्मानित वाटते का? तिलाशिक्षण, पिण्याचे पाणी आणि स्वच्छता सहजपणे मिळते का? यासंदर्भात महत्त्वाची माहिती उपलब्ध नाही? याचा विचार करून हा अहवाल लिहिण्यात आला आहे.
द टीनएज गर्ल्स (टीएजी) अहवाल २०८ हे देशाचे प्रगतीपुस्तक आहे जे भारतात किशोरवयीन मुलीचे आयुष्य कसे आहे याचे खरे चित्र दर्शवते. नन्ही कली प्रकल्पाने हाअहवाल सादर केला असून नांदी फाउंडेशनने त्याचे संकलन केले आहे. या कामासाठी महिंद्रा आणि महिंद्रा लि. ने अनुदानाद्वारे पाठिंबा दिला आहे.
महत्त्वाची वैशिष्ट्ये
शिक्षण आणि लग्नाची पसंती
भारतीय किशोरवयीन मुलींनी आश्वासक दृष्टीकोन दाखवला आणि विशेष म्हणजे, ग्रामीण व शहरी भागातील माहिती उल्लेखनीय असून ती यांसदर्भातील ग्रामीणभारताच्या प्रतिमेस छेद देणारी आहे. सर्वेक्षण असे सांगते, की
१) ८१ टक्के किशोरवयीन मुली सध्या शिक्षण घेत आहेत.
– सद्यस्थितीत अभ्यास करत असलेल्या किशोरवयीन मुलींपैकी आंध्र प्रदेश, केरळ, तेलंगणा आणि पश्चिम बंगाल यांनी सर्वाधिक गुण मिळवले असूनसर्वेक्षणात सहभागी झालेल्या १०० मुलींनी आपण अभ्यास सोडून दिला नसल्याचे सांगितले.
– सुमारे ७८ टक्के ग्रामीण मुली सध्या शिक्षण घेत असून शहरात हे प्रमाण ८७ टक्के आहे. यावरून देशभरात शिक्षणाचे महत्त्व किती आहे हे अधोरेखित होते.
२) ९६ टक्के किशोरवयीन मुली अविवाहित आहेत.
– अविवाहित असलेल्या शहरी मुली (९६.६ टक्के) आणि ग्रामीण मुली (९५.५ टक्के) यांच्यात अगदी कमी फरक आहे.
३) ७० टक्के मुलींना उच्चशिक्षण घ्यायचे आहे.
४) ७४ टक्के मुलींना शिक्षण संपल्यावर काम करायचे असून त्यांच्या डोक्यात विशिष्ट करियरची योजना आखलेली आहे.
– करियरची आकांक्षा शहरी मुलींइतकीच (८०.२ टक्के) ग्रामीण मुलींमध्ये (७१.८ टक्के) दिसून येते.
५) ग्रामीण तसेच शहरी भारतातील ७३ टक्के मुलींना वयाची २१ वर्ष पूर्ण झाल्यानंतरच लग्न करायचे आहे व तोपर्यंत त्यांना उत्पन्न मिळवायचे आहे.
आरोग्य आणि स्वास्थ्य
· ४० टक्के ग्रामीण मुलींमध्ये किशोरवयीन मुली आजही उघड्यावर शौचासाठी जातात.
· ४६ टक्के मुली मासिक पाळीदरम्यान अस्वच्छ साहित्य वापरतात.
o सर्वेक्षणातील एकूण ग्रामीण मुलींपैकी केवळ ४६.३ टक्के मुलींना मासिक पाळीदरम्यान स्वच्छ साहित्य उपलब्ध असते.
· दोनपैकी एका किशोरवयीन मुलीला रक्तक्षय (अनिमिया*) असतो.
o हिमोग्लोबिनचे प्रमाण शहरी (५१.५ टक्के) तसेच ग्रामीण (४६.८ टक्के) मुलींमध्ये समान आहे, यावरून देशातील स्थिती चिंताजनक असल्याचेस्पष्ट होते.
· दोनपैकी एका किशोरवयीन मुलीचा बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) ** कमी असतो.
o त्याचप्रमाणे शहरी (५०.५ टक्के) आणि ग्रामीण (४४.६ टक्के) भागातील मुलींपैकी अर्ध्या लोकसंख्येचा बीएमआय सामान्य आहे.